सार्वजनिक बांधकाम विभागाची तिरंगा रॅली
खामगाव:देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा ‘ अभियान यशस्वी करण्यासाठी प्रसार व प्रचार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर यांनी केले.सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रसार साठी शहरात प्रभात फेरी चे आयोजन १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.सकाळी ९ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यानी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करण्यात आले.यानंतर रॅलीला सुरूवात होऊन ही रॅली बसस्थानक चौक,टिळक पुतळा,मेनरोड,फरशी, नॅशनल हायस्कूल,अग्रसेन चौक, गांधी बगीचा शहर पोलिस स्टेशन रोड मार्गे काढण्यात आली. या रॅलीत उपकार्यकारी अभियंता सचिन तायडे, जितेंद्र काळे, प्रियंका पांडे, गजानन चोपडे, शाखा अभियंता सागर लाड, सागर धोटे, ज्ञानेश्वर थेरोकार, संदीप पाटील, सेवानिवृत्त अधिकारी गजानन ढोकणे, एकनाथ फुंडकर, शासकीय कंत्राटदार मोहन भागदेवानी, गजानन गोळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी अधिकारी, तसेच शासकीय कंत्राटदार सहभागी झाले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १४ ऑगस्टला रांगोळी स्पर्धा व कार्यमूल्यमापन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तर १५ ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली