सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन
खामगांव : आज दिनांक १४ मे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती स्वराज्य फाऊंडेशनच्या मुलींनी सोशल चे पालन करून साजरी केली.कोरोना व्हायरस संसर्ग मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे दरवर्षी प्रमाणे कुठल्याही जल्लोषात यावर्षीची छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी न करता स्वराज्य फाऊंडेशन च्या मुलींनी सुटाळपुरा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार, फुले अर्पण करून महाराजांना अभिवादन केले व छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची चर्चा देखील केली. तसेच छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य फाऊंडेशन तर्फे शंभुराजे या विषयावर चित्रकला स्पर्धा व शंभुचरित्र या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे त्याविषयी ची माहिती सुध्दा निर्भिड स्वराज्यच्या लाइव्ह मध्ये देण्यात आली.
यावेळी स्वराज्य फाऊंडेशन च्या सदस्या प्राप्ती देशमुख, वैष्णवी गायकी, प्राची बावणे, कोमल काळणे, उत्कर्षा बडगुजर, आश्विनी गवारगुरु, गौरी आरज, तेजल पाटील, साक्षी पाटील आदी उपस्थित होत्या. स्वराज्य फाऊंडेशन तर्फे शंभुराजे या विषयावर घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा तसेच अधिक माहिती करिता 9834465730 , 9970898881 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन स्वराज्य फाऊंडेशन तर्फे यावेळी करण्यात आले आहे.