विनायक देशमुख जलंब: स्वातंत्र्याचा’अमृत महोत्सव’ व देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने न्यु गंगा कृषी केंद्र”जलंब चे संचालक श्री अनंता नरवाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय ‘जलंब येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रक्तदान शिबीराला तरुणवर्ग यांनी सहकार्य केले,गावकरी तसेच पंचक्रोशीतील नागरीकांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर मध्ये पंचाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अकोला ब्लॅड बँक’ चे डॉ .पि.बी.इंगळे व त्यांची टीमने रक्त संकलीत केले.जलंब सरपंचपती उत्तम घोपे, ग्रामविकास अधिकारी काळे, महादेव सोनटक्के गुरुजी, रामभाऊ धामणकर गुरुजी,वासुदेव मोहे,अमोल काळे,सचीन हेलोडे,अमित देशमुख,महादेव मिरगे,डॉ.आर.के.राजपूत,चंद्रशेखर देशमुख,संतोष तुरे,भगवान नरवाडे,यासह महिला बचत गटाचे प्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली सर्व रक्तदात्याचे अनंता नरवाडे यांनी आभार मानले.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ व्यापारी शेगांव संग्रामपूर सामाजिक