शेगाव :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव यांच्या अंतर्गत दिनांक आठ ऑगस्ट ते 17 ऑगस्ट च्या विविध उपक्रमांच्या जनजागृतीसाठी शेगाव पंचायत समितीने तालुक्यात प्रचार रथाची सुरुवात केली असून प्रचार रथाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री एस.व्ही.देशमुख साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी श्री चव्हाण साहेब व विस्तार अधिकारी दळवी साहेब शेख साहेब यांनी हिरवी झेंडी दाखवून केली . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची गावोगावी प्रसिद्धी व्हावी व प्रत्येक घरावर ध्वज उभारणी होऊन देशाप्रती असलेला आपला सद्भाव प्रकट व्हावा यासाठी पंचायत समिती स्तरावरून तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रसिद्धीसाठी प्रचाराथाची सुरुवात करण्यात आली . प्रचारार्थाची सुरुवात पंचायत समिती शेगाव येथून करण्यात आली . ग्रामसेवक यांनी वंदे मातरम भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरायू हो या नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला . यावेळी गटविकास अधिकारी श्री एस व्ही देशमुख साहेब विस्ताराधिकारी संदीप दळवी साहेब शेख साहेब विस्तार यांनी गाव पातळीवर प्रसिद्धीसाठी बॅनर प्रत्येक व्यक्तीसाठी पोम्प्लेट चे वितरण करून सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद नांदुरा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर शेगांव संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा