जळगाव जामोद:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर कमिटीच्या वतीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद तालुका आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूकीच्या अनुशंगाने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तालुक्यातील पक्षाच्या कामाचा आढावा पक्ष पदाधिकार्यांमार्फत घेतला. आगामी काळात येणाऱ्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष व्हायला हवा त्यादृष्टीने कामाला लागा असे निर्देश डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले. सदर बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ व कार्याध्यक्ष महादेव भालतड़क यांनी ४० लोकांची कार्यकारणी तसेच १४० लोकांची कायम निमंत्रित जम्बो कार्यकारणी तसेच शहराध्यक्ष अजहर देशमुख व कार्याध्यक्ष संजय ढगे यांनी २५ लोकांची शहर कार्यकारणी घोषित करण्यात आली . यावेळी दुर्गा चौक मध्ये जळगाव जामोद शहर कार्यालयाचे तसेच तंजीर जमदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटिल, विधानसभा अध्यक्ष प्रकाश ढोकने,विश्वनाथ झाडोकार, राजुभाऊ भोंगळ, रमेश उमाळे,युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे,जिल्हा सरचिटणीस संदिप उगले,रंगराव देशमुख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद, कार्याध्यक्ष एम.डी.साबीर, महिला तालुकाध्यक्ष वर्षाताई वाघ, मनोहर वाघ, डॉ. प्रशांत दाभाड़े,शेख जावेद,हमीद भाई, संजय देशमुख, प्रकाश गावंडे, सुभाष कोकाटे, संजय मारोडे, अरुण निंबोळकार, राजुबाप्पू देशमुख,बाळूभाऊ डिवरे,ऑड. मोहसिन खान,विश्वासराव पाटिल, दिनकरराव दाभाड़े,महादेव वानखड़े, प्रकाश कराळे,दीपक वसतकार,वामनराव गुडेकर,ईरफान खान,आशिष वायझोड़े,अब्दुल जहीर, अनूप महाले, अताउल्लाह पठान, सिद्धार्थ हेलोडे, योगेश घोपे, ऋषिकेश देशमुख यांच्यासह हजारो लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीम खान यांनी तर आभार प्रदर्शन दत्ता डिवरे यांनी केले.
previous post
next post