October 6, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटखा

शहरात गुटखा विक्री जोमात

खामगांव : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे खामगाव शहरात शिवाजी वेस भागात गुटखा पडल्याच्या घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे यामध्ये खामगाव शहर गुटखा विक्री चे मुख्यकेंद्र बनले आहे. आतापर्यंत शहरांमध्ये अवैध गुटखा विक्री विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. तरीसुद्धा गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अन्न प्रशासन विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. आज दिनांक आज २१ एप्रिल २०२१ रोजी येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गल्लीमधून पोलिसांनी अवैधरित्या साठवलेला ६ हजार रुपयाचा गुटखा पकडला असून आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये गोपाळ नगर मध्ये राहणारा विजय त्र्यंबकराव वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सदर प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्रकरण वर्ग केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अन्न व प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मागणी केली होती की गुटखा विक्री करणाऱ्यांना जामीन मिळू नये,आणि गुटखा विक्रिचे केंद्रबिंदु असलेल्या खामगाव मधे गुटखा पकडण्यात आला आहे. यावरून एकच लक्षात येते की पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या जिल्ह्यातच अवैधरीत्या गुटखा विक्री जोमात सुरू आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांवर नेमके अभय कोणाचे ? डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आपल्याच खात्याकडे लक्ष नसल्याची अशी चर्चा खामगाव मधील नागरिकांमध्ये जोमात सुरू आहे.

Related posts

गुंजकर कोचिंग क्लासेसमधे NEETJEE/MHT-CET/BO-RD प्रवेश प्रक्रिया सुरु

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये ही ते करतायेत गौ-सेवा

nirbhid swarajya

बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा संकल्प

nirbhid swarajya
error: Content is protected !!