बुलडाणा : स्थानिक स्त्री रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड -19 रूग्णांच्या अलगीकरण कक्षाची पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ७ एप्रिल रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी कक्षातील सुविधा, अडचणी जाणून घेतल्या. तसेच आरोग्यविषयक सुविधांचाही आढावा घेतला.शासनाने स्त्री रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून जाहीर केले आहे. या रूग्णालयात कोरोना संशयीतांचे विलगीकरण करण्यात येत आहे. या रूग्णालयातील बेड, तेथील स्टाफची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, रूग्ण क्षमता, सद्यस्थितीत असलेला साठा, स्वच्छता आदींविषयक परिस्थिती जाणून घेत पालकमंत्री यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत उपस्थित होते. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
next post