टीव्ही जर्नालिझम म्हणजे एक आकर्षण त्यातल्या त्यात रेस्ट ऑफ महाराष्ट्रात तर टीव्हीवर दिसणाऱ्या पत्रकार म्हणजे जणू एखादा सेलिब्रिटी कारण टीव्हीवर धडपडणारे कधी प्रत्यक्षात दिसत तर नाहीत पण ग्रामीण भागात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्ट्रिंजर जेव्हा न्यूज साठी फिरतो तेव्हा खेड्यांमधील सामान्य माणसाला टीव्ही पत्रकार म्हणजे जणू काही वेगळेच वाटायला लागते कॅमेरा बाहेर काढला आणि बूम समोर केला कि गावात गर्दीच गर्दी उसळायला सुरुवात होते. हे वाचून बरे वाटेल पण काम करताना ज्या असंख्य अडचणींवर मात करून स्ट्रींजर हा प्राणी यासाठी धडपडत असतो मात्र आज काळ बदलला आहे टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड क्रांती झाली आहेम्हणून रेस्ट ऑफ महाराष्ट्र मधून इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील स्ट्रिंजर या जमातीला थोडे चांगले दिवस आले.मात्र कामाबाबत आजही स्ट्रिंजर भटक्या-विमुक्त जातीप्रमाणे बातम्या मिळवण्याकरिता भटकंती करतो. भटक्या-विमुक्त याकरिता हा शब्दप्रयोग केला कारण स्ट्रिंजर ही इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील अंतर्गत अशी दूरी दुर्लक्षित राहिलेली जमात असे मी म्हणेन कारण टेक्नॉलॉजी विकसित झाली क्रांती झाली मात्र स्ट्रिंजर च्या समस्या आणि त्यांच्या पत्रकारितेची दखल पाहिजेत अशी घेतली जात नाही हा माझं स्पष्ट आरोप समजला तरी हरकत नाही.काही अपवादात्मक चैनल मधील संपादक इनपुट आऊटपुट असाइनमेंट मत वरील काही लोक वगळता बरे स्ट्रिंजर यांना वाईट अनुभव येतो असो हा विषय खूप मोठा आहे यावर स्वतंत्र लेख लिहावा लागेल पण आज मला ग्रामीण भागातील न्यूज चैनल मधील पत्रकारिता यावर जरा भूतकाळ आणि वर्तमान काळ मांडायचा आहे माझ्या पत्रकारितेला 2001 मध्ये सुरुवात झाली अमरावती वरून प्रकाशित होणारा हिंदुस्थान या वर्तमानपत्रात पत्रकारितेला विदर्भातील बुलढाणा येथे सुरुवात केली काही वर्षांनी मला महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि नाव लोकी असलेल्या लोकमत मध्ये जॉब मिळाला आणि मग तिथून माझ्या पत्रकारितेला एक नवीन आयाम मिळायला सुरुवात झाली पण तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढा विकसित झाला नव्हता तेव्हा फक्त शासकीय दूरदर्शन आणि झी न्यूज ची अल्फा टीव्ही मराठी न्यूज चॅनल सुरू होते. पण मी स्वप्नात विचारही केला नाही की आपण टीव्हीवर दिसणार आणि टीव्हीवर पत्रकारिता करू अचानक मीडिया मधील काही व्यक्तींसोबत ओळख झाली आणि तिथून सुरू झाला इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकारितेचा प्रवास. 2005 सालि मी मुंबईला कामानिमित्त आलो तेव्हा माझी ओळख मंदार फणसे यांच्यासोबत झाली. ते ‘अल्फा टीव्ही ‘मराठीला बातम्या द्यायचे. स्क्रीनवर दिसायचे म्हणून जास्त आकर्षण. पण त्यांनी मला काही बातम्या,घटना असेल तर कळवत जा, असे सांगितले. मग मी काही न्यूज असली की त्यांना एमएमएस फॅक्स करायचो.न्यूज लागली तर ड्राय न्यूज लागायची ,पण मी अधिकृत प्रतिनिधी म्हणून नव्हतो. मुंबईला ‘ अल्फा टीव्ही ‘ ला न्यूज पाठवतो याचेच मला खूप समाधान आणि मग मी त्यांच्या संपर्कात राहायला सुरुवात केली आणि तिथून माझा इलेक्ट्रॉनिक मीडियामधील प्रवास सुरू झाला. एक चॅनलचा एक उत्तम पत्रकार बनायचे, हे स्वप्न उराशी ठेऊन मी आयुष्यात स्ट्रगल करत होतो. मग अचानक मला हिंदी न्यूज ‘चॅनल ७’ ला चान्स मिळाला. आज तेच ‘आयबीएन ७’ चॅनल म्हणून ओळखले जाते.त्या वेळी आयबीएन ७ ला रवींद्र आंबेकर यांच्या सोबत काम करताना बरेच काही शिकायला मिळाले. पण नॅशनल न्यूज चॅनल आणि नंतर मग आयबीएन लोकमत असा प्रवास झाला. पण विदर्भात केलेली पत्रकारिता तिचा प्रवास आजही डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भ म्हंटले की शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न हाच मुख्य मुद्दा. त्याला जास्त प्रखरतेने बातमी मधे मांडायचा. त्यासाठी दिवसभर मिळेल त्या वाहनाने विविध गावांमध्ये जाऊन मी बातमी करत असायचो. खरे तर १० वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत होते, तेंव्हा असे बरेच प्रसंग आहेत जे आज आठवले तर विश्वास बसत नाही की त्या वेळी एवढ्या साऱ्या संकटावर मात करत काम केले! इलेक्ट्रॉनिक मीडिया मधे काम करताना महत्त्वाची गोष्ट स्वतः चा कॅमेरा असणे आवश्यक होते. पण तेंव्हा कॅमेरा आमच्या भागात आलेच नव्हते. मग स्टुडीओ वर जाऊन कॅमेरा भाड्याने घेऊन मी न्यूज कव्हर करत होतो. कधी कधी बाईट शूट असल्याने ऑफिसमधून खूप बोलणे खाण्याची वेळ पण आमच्यावर यायची. कारण आमच्याकडील कॅमेरामन म्हणजे कमर्शीअल व्हिडिओ शूटिंग करणारे आणि त्यांच्यामार्फत शूटिंग करणे भाग होते. महागडा कॅमेरा कोण घेणार? त्यात पण मग मार्केटमध्ये हँडी कॅमेरा आले. ते जरा स्वस्त होते, पिडी कॅमेऱ्यापेक्षा आणि तेंव्हा मग ४० ते ५० हजार रुपये असलेला कॅमेरा मी घेतला आणि स्वतः चा कॅमेरा शिकून शूट घ्यायला लागलो. खरे तर मुंबईमधला रिपोर्टर फक्त बूम घेऊन फिरतो. मला कोण कमी जास्त हा उल्लेख इथे नाही करायचा. मात्र ग्रामीण भागातील चॅनलचा पत्रकार स्वतः च कॅमेरा चालवतो. शुटस घेतो. एका हातात कॅमेरा तर दुसऱ्या हातात बूम घेऊन न्यूज कव्हर करायची. ती स्वतः च फिड, एडिट सुध्धा करायची आणि एडिट झालेल्या फाईल ‘एफटीपी ‘ वरुन पाठवतो सांगायचे. तात्पर्य हे च की एक व्यक्ती पत्रकार, कॅमेरामन या सर्व भूमिका साकारून टीव्ही पत्रकारिता करत असतो. खरे तर एफटीपी वगैरे ब्रॉडबँड यायच्या अगोदर मी ज्या जिल्ह्यात काम करत होतो, तिथे न्यूज कव्हर करणे म्हणजे ४० – ५०, ७० – ८० किलोमीटर प्रवास करायला लागत असेल. त्यातून जर ती न्यूज ब्रेकिंग किंवा अति महत्वाची असेल तर फीड पाठवायला अमरावती जे १५० किलोमिटर म्हणजे ३ ते ४ तास पुन्हा प्रवास करून रिलायन्सच्या वेबवरून नोएडाला फीड टाकावे लागायचे. पण मग आता ब्रॉडबँड प्रत्येक जिल्हाजिल्ह्यात पोहोचले आणि आमचा त्रास कमी झाला. नाही तर न्यूज कव्हर केल्यावर ३ ते ४ तासांचा ठरलेला असायचा आणि परतीला ३-४ तास म्हणजे ८ तास प्रवास. आता ब्रॉडबँडमुळे एफटीपीने फिड पाठवण्याची व्यवस्था झाली. कधी कधी ऑफिस मधून सांगण्यात यायचे, पी 2 सी मारा स्टोरीमध्ये. मग स्टोरी कव्हर करायला दूर गावाला एकटे बाईकवर जाणे आणि स्टोरी कव्हर केली की मग आता आता पी2सी कोण शूट करेल, हा प्रश्न? पण त्यावर उपाय काय तर मी ट्रायपॉडवर कॅमेरा लावून ठेवायचो आणि बरोबर अंतर मोजून एलसिडी स्वतः कडे फिरवून घेत स्वतः च कॅमेऱ्याचे शूट शूट बटन दाबून पळत पळत एलसीडीसमोर उभा राहून २-३ वेगवेगळे पी 2 सी मारून घ्यायचो. कारण पर्याय नसायचा. स्वतः च पत्रकार, कॅमेरामन या भूमिका स्वीकारून काम करण्याची सवय झाली होती. पण दूर दूर प्रवास करून एखादी बातमी शूट करून स्वतः च कॉम्प्युटर वर बसून ते फिड एडिट करणे, स्क्रिप्ट लिहिणे म्हणजे एक दिवस पूर्ण जायचा आणि जेंव्हा न्यूज ऑफिसला पाठवून मध्ये जर एखादी मुंबई – दिल्ली ची ब्रेकिंग न्यूज आली की आमची बातमी न लागता च मरायची. त्यात जो त्रास व्हायचा तो सांगू शकत नाही. पण इलाज नसायचा. कारण शेवटी नॅशनल न्यूज ला प्राधान्य देणे काम आहे. त्यात मीच काय असंख्य स्ट्रिंजर च्या न्युज या असाच आजही डेड होतात त्याला इलाज नाही मला आठवते की जेव्हा खैरलांजीहत्याकांड घडले तेव्हा महाराष्ट्र पेटला होता. तेव्हा माझ्या जिल्ह्यात एक बस जाळून टाकण्यात आली. मला माहित पडताच ऑफिसला सांगितले. ऑफिसने लगेच जा, कव्हर कर आणि लवकर पाठव सांगितल्यावर मी अर्धा तास प्रवास करून स्पॉटवर पोहोचलो त्या बसचे शोध घेऊन फीड करण्याकरिता बुलढाणा ते अमरावती असा त्यांचा प्रवास सुरू झाला मला एक तासाने ऑफिसचा कॉल आला जडती बस पाठवू नका मी म्हणालो का काय झाले तर ऑफिस मधून सांगण्यात आले पुण्याला डेक्कन ट्रेन जाळून टाकण्यात आली त्याचे विज्युअल्स येत आहेत त्यांच्यासमोर हे विजुअल्स चालणार नाहीत मग काय मी न्यूज कव्हर केल्यावर मेहनत घेऊन पण मला परत यावे लागले. असे बरेच अनुभव यायचे पण दुसऱ्या दिवशी सारे काही विसरून नव्या बातमीच्या शोधात पुन्हा कामाला सुरुवात करायचं मी आयबीएन लोकमतला असताना माझे जिल्ह्यात त्यावेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या एका आमदार परिवाराच्या सावकारी जाळ्यात असून शेतकरी अडकले होते ती न्यूज मी लावून धरली शेतकरी सावकारी जाळ्यात त्याच्या असंख्य सिरीज चालवल्या तेव्हा त्या आमदार किंवा त्यांच्या समर्थकांकडून मला विविध धमक्यांचे फोन यायचे पण माझ्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी माझ्या माझ्या मागे ‘ आयबीएन ‘ ची टीम उभी राहीली त्यामुळे या गावगुंडांना न घाबरता मी रात्री अपरात्री जिल्ह्यात फिरून न्यूज कव्हर करायचो पण हा मुद्दा या ठिकाणी सांगण्याचे तात्पर्य एवढेच की माझ्यासारखे असंख्य स्ट्रिंजर हा त्या-त्या जिल्ह्यात बातम्या टाकून स्थानिक गावगुंडांसोबत खेळत असतात. त्यांना कोणते संरक्षण नसते आणि ग्रामीण भागातील गावगुंड नेहमी आसपास कुठे ना कुठे भेटत असतात. मुंबईमध्ये तसे नाही इथे विरोधात न्यूज आली तरी ते विरोधक लवकर एकमेकांना समोरासमोर दिसत नाहीत तर गावाकडे पत्रकारिता करताना त्या पत्रकाराला जास्त धोका असतो शेवटी पत्रकारिता कोणा व्यक्ती विरोधात नसून सामाजिक राजकीय व्यवस्थेला विरोधात असते पण विरोधात आलेली बातमी म्हणजे पत्रकार दुश्मन असा समज करून त्या पत्रकाराला त्याच्या कुटुंबाला विविध मार्गांनी त्रास देणे सुरू असतात याचा अनुभव मी घेतलाय असो पण इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील ग्रामीण भागातील प्रवास जेवढा सुंदर आहेत तेवढेच भयानक आहे. एका लेखांमधून संपूर्ण चित्र म्हणता येणार नाही पण प्रयत्न केलाय. शेवटी न्यूज चॅनेलचा स्ट्रिंजर हा पाठीच्या कण्यासाररखा चॅनल चा कणा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष ठेवून देशाचा राज्याचा खरा सामाजिक सांस्कृतिक चेहरा आपण स्क्रीनवर दाखवू शकणार नाही हे वास्तव आहे. – राहुल पहुरकर. (वरिष्ठ संपादक) एक स्ट्रिंजर ते वरिष्ठ संपादक असा प्रवास करणारे आमचे मार्गदर्शक निर्भिड स्वराज्य चे सर्वेसर्वा राहुल भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. |
previous post