खामगाव :-बुलडाणा जिल्यातील खामगाव येथील अ. खि. नॅशनल शाळेच्या शिक्षिका व गृहलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच पोलीसविभागाच्या महिला दक्षता समिती शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव च्या अध्यक्षा सौ. स्वातीताई गजानन कुलकर्णी यांना जागतिक महिला दिनी दिल्या जाणारा जिजाऊ कन्या पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सौ. स्वाती कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सौ. स्वाती ह्या महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असून गेल्या 27 वर्षा पासून त्या शिक्षण देण्यासोबत महिला जागृती चे कार्य करीत आहेत. सहज योगाच्या माध्यमातून मानवी जीवनाला चालना देण्याचे भरीव कार्य सुध्दा त्या करीत असून अनेक लोकांना या साठी मार्गदर्शन लाभावे म्हणूंन स्वाती कुलकर्णी ह्या आचार्य बाल संस्कार केंद्र व सहजयोग ध्यान केंद्राचे माध्यमातून त्या जनजागृती उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या भरीव कार्याबद्दल राज्यात महिलांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक तथा विविध महिला सन्मान विषयक कार्याची दखल घेऊन सौ. स्वातीताई कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दूरदर्शन चे जिल्हा प्रतिनिधी गजानन कुलकर्णी यांच्या सौ. स्वाती कुलकर्णी ह्या पत्नी असून छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेबांचा जिल्हा असलेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात महिला दिनाच्या पर्वावर त्यांना जिजाऊ कन्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.