शेगाव : तालुक्यातील टाकळी विरो या गावांमध्ये गेल्या ५ वर्षापासून इलेक्ट्रिक लाईट नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इलेट्रिक लाईट व सौर ऊर्जा लवकरात लवकर सुरू करावे अशा मागणीचे निवेदन आझाद हिंद संघटना शेगाव तर्फे आज पंचायत समिती सभापती यांना देण्यात आले. आझाद हिंद संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की १४-७-२०१६ पासून ग्राम टाकळी विरो येथील पूर्वेकडील भागातील इलेक्ट्रिक लाईट बंद असून त्यामुळे होणाऱ्या गैरसोयींमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या भागात अंधार असल्यामुळे साप व विंचू चावण्याच्या घटना वेळोवेळी घडत आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या व त्यानंतर २०२० मधे झालेल्या पंचायत समिती शेगाव यांच्या चौकशीमध्ये सांगून सुद्धा ग्रामसेवक यांनी त्याची नोंद न घेता जाणून-बुजून लाईट लावत नसल्याचा आरोप सुद्धा आझाद हिंद संघटनेने केला आहे.गावकऱ्यांनी वेळोवेळी मागणी करत असताना ग्रामसेवक यांनी मागणी करणारे ग्रामस्थांना “तुमच्याकडून जे होत असेल ते करा” पण लाईट कोणत्याही परिस्थितीत लावणार नाही, अशा धमक्या सुद्धा दिल्या आहेत. तरी लवकरात लवकर सदर प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आली आहे.याप्रकरणी विलंब झाल्यास उद्भवणार्या घटनेस संपूर्ण पंचायत समिती कार्यालय जबाबदार राहील असेसुद्धा आझाद हिंद हिंदू संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नलिनी उन्हाळे यांनी सांगितले आहे.यावेळी आझाद हिंद संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
next post