शेगांव : कोरोनाचे संकट पाहता सोशल डीस्टसिंग पाळत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत शेगांव तालुक्यातील खेर्डा येथील मुलगा ज्ञानेश्वर व कुरणगाड बू येथील राजकुमार पाटील यांच्या कन्या मोनिका यांचा विवाह सोहळा पार पडला.
स्वकियांनी ‘व्हिडिओ कॉल’ द्वारे वर वधूला आशीर्वाद दिले. हा विवाह सोहळा ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. दोन्ही परीवारामधे लग्नाची तयारी सुरू होती. मात्र कोरोना विषाणूच्या प्रकोपाणे देशात लॉकडाऊन झाले. अशा परिस्थितीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत वर-वधूच्या आई-वडिलांसह केवळ मोजक्या चार ते पाच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. अशा प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा घरात विचार केला. याला घरातील सर्वांनी दुजोरा दिला. यावेळी प्रामुख्याने ग्रामसेवक,सरपंच, ग्रा.पं. कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
previous post