शेगाव :- परिसरातील शेतशिवारात मुबलक पाऊस झाला . त्यातच पिकांवर वाणी कीटकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे . त्यामुळे कृषी अधिकारी देशमुख मॅडम यांनी शनिवारी शेतात जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . तालुक्यातील पावसाचे प्रमाण बरे असल्याने 99 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली . मात्र हंगामातील पिके बऱ्याच प्रमाणात डोलत असून त्यावर वाणीसह किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे . सोयाबीन , कपाशी या पिकांवर वाणी किडीने हल्ला केला आहे . लासुरा शेत शिवारातील शेतात जाऊन सोयाबीन व कपाशीची पाहणी केली . सोयाबीन पिकावर वाणी , पाने खाणारी अळी , ( उंट अळी , ) आढळून आल्या . तसेच सोयाबीन पिवळे पडलेले दिसले . यासाठी नियंत्रण म्हणून एमामेकटींन बेंझोएट ५ ग्राम १० लिटर पाणी , पाने खाणारी अळी , पिवळे सोयाबीन नियंत्रित करण्यासाठी चिलिटेड मायक्रो नूट्रीरिएंट फवारणे ५ ग्राम प्रति १० लिटर फवारणे , पिवळे सोयाबीन नियंत्रित करण्यासाठी १ ९ : १ ९ : १ ९ ( ७५ ग्राम / १० लिटर पाणी ) याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी लासुरा परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते