खामगांव : स्वस्तात सोन्याच्या दागिन्यांचे आमिषे दाखवून अनेकांना गंडा आल्याचा प्रकार खामगाव शहरात अनेक वेळा समोर आला आहे.असाच प्रकार आज मुंबईच्या एका इसमाला सोन्याच्या गिन्न्या देण्याचे आमिष दाखवत ७ लाखाने गंडविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका 45 वर्षीय इसमाला काही दिवसा अगोदर खामगाव परिसरातून एका अनोळखी इसमाने मोबाईलद्वारे संपर्क साधून सोन्याच्या अर्ध्या किमतीमध्ये देण्याचे आमिष दाखविले.या आमिषाला बळी पडून सदर इसम आज सकाळी त्यांच्या नातेवाईकांसह अकोला मार्गावरील टेंभुर्णी फाटा जवळ पोहोचला असता त्या ठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेल्या अनोळखी इसमांनी मुंबईच्या इसमाकडून ७ लाख रुपये घेऊन गिन्न्या न देता तेथून पळ काढून त्याची फसवणूक केली आहे.
स्वतःची फसवणूक झाल्याचे समजताच सदर नागरिकाने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तडवी हे सुद्धा शहर पोलीस स्टेशन ला दाखल झाले होते. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेऊन पोलिसांनी तात्काळ त्या इसमाचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. घटनास्थळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने त्यांना ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पाठविण्यात आले होते तर महम्मद इरफान जियाउद्दिन अन्सारी यांच्या तक्रारीवरून आरोपी संतोष व तीन आरोपी विरुद्ध भादवी 420, 34 नुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.