जळगाव जा : वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या दमदार पावसामुळे सोनाळा हिवरखेड रोडवरील झाडे पडल्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस अधिकारी पो.हे.कॅ. सय्यद व सार्वजनीक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता देशमुख साहेब घटनास्थळी दाखल होऊन वाहतुकीस निर्माण झालेला अडथळा दूर केला.अचानक झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसाने सोनाळा गावातील निबाचे झाड पडून घर पूर्णता कोसळलं. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही,परंतु सुनील आत्मराम ससाणे याचे घर जमीनदोस्त झाले. सदर कुटुंब मोलमजुरी करीत असून घर मोडल्यामुळे पावसाच्या दिवसात ससाणे याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ससाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी यासाठी मागणी केली आहे.परीसरात जोरदार पावसामुळे नदी नाल्याना सुद्धा पूर आला आहे.