प्रजासत्ताक दिनानिमित्त बंटी पहुरकर यांचा स्तुत्य उपक्रम
खामगाव: आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पैसा कसा कमवावा या धावपळीत असतो. आणि त्यात काही वाईटही नाही. परंतू काही लोक समाजाप्रती देशाप्रती आपुलकी ठेवून असतात. त्यापैकीच एक म्हणजे येथील खामगाव येथील संदीप उर्फ बंटी पहूरकर हे व्यक्तिमत्व आहे.त्यांनी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून संपूर्ण राज्यातील आजी व माजी सैनिकांसाठी ब्रोकिंग मोफत प्रॉपर्टी डीलरशिप योजना सुरू केले आहे.
बंटी पहुरकर हे व्यवसायाने ते एक प्रॉपर्टी डीलर आहेत.असे असले तरी सैनिकांसाठी त्यांनी हा स्तुत्य उपक्रम आजच्या प्रजासत्ताक दिनापासून संपूर्ण राज्यातील सैनिकांसाठी सुरू केला आहे.या योजनेबद्दल बोलताना ते म्हणतात देहाकडून देवाकडे जातांना देश लागतो आणि या देशाचं आपल्याला काही देणं लागतं म्हणून थोडं देशासाठी सैनिक बांधवांसाठी काही करावं म्हणून सैनिक बांधवांसाठी नो ब्रोकरेज.. प्रॉपर्टी खरेदी विक्री सेवा आज दि.२६ जानेवारी २०२२ पासून आजीवन मोफतसुरू करत आहोत. या माध्यमातून देशासाठी जीवन घालवणाऱ्या सैनिकांच्या सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा एक अल्पसा प्रयत्न करत आहोत. तरी संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही आजी-माजी सैनिक बांधवांना प्रॉपर्टी घ्यायची,प्रॉपर्टी विकायची असल्यास किंवा प्रॉपर्टी बद्दल माहिती हवी असल्यास सैनिकांनी संपर्क साधावा. संपूर्ण महाराष्ट्रात सैनिकांसाठी प्रॉपर्टी बद्दल 24 तास मोफत सेवा देणार आहोत. अधीक माहितीसाठी
होप्स प्रॉपर्टी सर्व्हिसेस खामगाव 9970427295/8208138763 या मोबाईल नंबर संपर्क करावा असे त्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले आहे