खामगांव : सध्या सर्वत्र पक्षांतराची वारे वाहत असून उद्या एक सेनेतून वंचित झालेल्या माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त माहिती पडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण पक्षांतर करीत असून सेनेतून वंचित झालले एक माजी आमदार उद्या मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.याकरिता बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर हे त्यांच्यासोबत मुंबई येथे रवाना झाले आहे. सेनेतील वंचित झालेल्या आमदाराची भाजप प्रवेशाची संपूर्ण जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. बुलढाण्यातील सेनेच्या आमदाराला टक्कर देण्यासाठी माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
previous post