कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक हटकर जखमी
खामगांव : खा.सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पिकअप गाडीने धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक हटकर व शांताराम बोधे यांच्यासह काहीजण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होत्या. बुलढाणा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आटपुन त्या शेगाव कडे स्व. शिव शंकर भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी भेटीसाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी नांद्री फाट्याजवळ राष्ट्रवादीची कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोक हटकर व ५० ते ६० राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उभे असतांना बुलढाणा कडून भरधाव वेगाने येणारी पिकअप फाट्यावर उभ्या असलेल्या घोळक्यात घुसली. यामध्ये अशोक हटकर व भाजपाचे शांताराम बोधे व अन्य काही जणांना पिकअप ची धडक लागल्याने हे जखमी झाले आहेत. सर्वांना जखमींना खामगांव येथील सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता अशोक हटकर व बाकी सर्व जखमींची प्रकृती ही ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. अशी माहिती अशोक हटकर यांचा मुलगा गौरव हटकर याने दिली आहे.