खामगाव : सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे गौतमी पाटील हिची बदनामी होत असून नेटकरांकडून ट्रोल व्हावे लागत असल्याने राज्यात खळबळ माजली आहे.गौतमी पाटील हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नृत्यकलेचा अविष्कार करून अल्पावधीतच सुप्रसिद्ध नृत्यांगणा म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
एवढेच नव्हे तर लाखो दिलांची धडकन आणि तरुणांच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या गौतमी पाटील चे फेसबुक अकाउंट मागील काही दिवसांपासून हॅक करण्यात आले असून त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.मात्र सदर फेसबुक वरील अश्लील पोस्ट पाहून नेटकऱ्यांकडून नानाविध प्रश्न उपस्थित करून टोल केले जात आहे.त्यावेळेस सहाजिकच गौतमी पाटील हिला बदनामीला समोर जावे लागत असल्याने चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव सामाजिक सोलापुर सौंदर्य