मुंबई : मसाल्यांचा बादशाहा या ब्रीदवाक्यातून घराघरात पोहोचलेल्या ‘एमडीएच’ मसालेचे संस्थापक धर्मपाल गुलाटी यांचे आज दि. ३ डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले.गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. मात्र वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज संपूर्ण जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेल्या या व्यवसायात आज कोट्यांची उलाढाल होत आहे. धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता हा व्यवसाय समर्थपणे पुढे नेत आहेत.२०१९ साली गुलाटी यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. यापूर्वी अनेकदा गुलाटी यांच्या मृत्यूसंदर्भातील अफवा पसरवली गेली होती मात्र तेव्हा त्यांनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे पत्रक काढून सांगितलं होतं.
previous post