खामगाव : सुधारित आणेवारी जाहीर करा, जिल्ह्यात भेदभाव न करता सर्व शेजाऱ्यांना मदत करा अन्यथा राज्य सरकार ला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मदत जाहीर करेपर्यंत झोपू देणार नाही असा इशारा आज भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया चे प्रदेश संयोजक सागर फुंडकर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या या विविध मागण्यांसाठी काल इशारा आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खामगांव तालुक्यातील सन २०२०-२१ च्या खरीपाच्या पेरण्या जुन, जुलै मध्ये आटोपल्या तेव्हापासुन कुठे कमी कुठे जास्तं पाऊस त्यामुळे पेरण्या उलटल्या तसेच बोगस बि, बियाणे मिळाल्यामुळे दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. आणी मग जुलै पासुन विक्रमी पाऊस पडायला लागला.

प्रचंड पाऊस, महापूर, शेतात पुर गेल्यामुळे जमिनी खरडुन पिकांचे प्रचंड नुकसान झाले,शेतकऱ्यांचे नगदी पिक, मुग, उडीद, सोयाबीन, तिळ, पुर्णपणे सडले, केळी, मका, उस, कापुस पुर्णपणे नष्टं झाला. फळबाग अतिवुष्टीमुळे नष्टं झाल्या. उरला सुरला शेतकरी परतीच्या पावसाने देशोधडीला लागला. तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत देणे अतिशय गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जगाव की मराव अशा परिस्थितीत, मरणाच्या दारात उभा आहे. तेव्हा खामगांव तालुका अतिवुष्टी मध्ये समाविष्टं करून, शेतकऱ्यांना पिक विमा, शासनाने जाहीर केलेली हेक्टंरी मदत मिळावी, पर्जन्यमांन कमी दाखवुन पिक आणेवारी ५० पैशावर काढली ती रद्द करून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शासनाची सर्व मदत मिळावी

तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी खामगांव तालुका शेतकऱ्यांसह तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल मग याची जबाबदारी प्रशासन व सरकार ची राहील असा इशारा यावेळी सागर फुंडकर यांनी दिला. यावेळी सागर फुंडकर यांचेसह भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिंनगारे, सदस्य तथा माजी नगराध्यक्ष गणेश माने, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, प स सभापती सौ रेखाताई मोरे, उपसभापती सौ शीतलताई मुंडे, कृ उ बा स सभापती संतोष टाले,संचालक दिलीप पाटील,जि प सदस्य पुंडलिक बोंबटकार,शांताराम बोधे,

प स सदस्य तथा महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ उर्मीलताइ गायकी, विलास काळे, रामेश्वर बंड, तुषार गावंडे, डॉ एकनाथ पाटील, बळीराम लहुडकार, किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, विजय महाले, विनोद टिकार, अंबादास उंबरकार, समाधान मुंडे, वैभव डवरे, ज्ञानदेव चिमनकार,वसंतराव वानखडे, मुन्ना दळी, गजानन कळसकार, प्रवीण ढोरे , सौ रेखा घोंगे, सौ श्रद्धा धोरण, सौ भक्ती वाणी, गणेश निमसे, श्यामराव वाघोले, रमेश डवंगे, मनोज क्षीरसागर, सौ नीता खंडागळे, सुनील वाढे, उमेश चांडक, सदाशिव राऊत, आबेद खान, अनंता शेळके, सुरेश हिंगणकार, देवानंद इंगळे, महादेव देव्हाणे, अरुण पांढरे, अनुराधा म्हसकर, प्रवीण म्हसकर, ज्ञानेश्वर मोरखंडे, मुरलीधर हंतोडे, रामविजय अमलकार, प्रतीक मुंडे, समाधान मुंडे, रवी गायगोळ, मनोहर इंगळे, आदी भाजपा खामगाव तालुका व शहर चे पदाधिकारी , सदस्य , कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.