November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा मलकापूर

सुद्दढ शरीरयष्टी हेच खरे धन होय:-रमेश कंडारकर

संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन,अभिनव हेल्थ क्लबच्या उपक्रम

मलकापूर : आज धावपळीच्या जीवनात सुद्दढ शरीर , सुंदर निकोप शरीर हेच खरे धन होय पैसा , शेती – जमीन हे धन जगण्यासाठी जरूर असले तरी सुंदर व यशस्वी जगायचे तर मजबूत व निकोप शरीर हवे असते . त्यासाठी योग , आसने सूर्यनमस्कार व्यायामाची जोड हवी .

शरीरधन हेच खरे धन असते .असे प्रतिपादन गाडगेबाबा विचारमंचाचे अध्यक्ष रमेशजी कंडारकर यांनी केले.घिर्णी रोडवरील स्वतःच्या शेतात. संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त व अभिनव हेल्थ क्लबच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार रमेशमी उमाळकर होते .”आरोग्यं धन संपदा ‘ या उक्तीप्रमाणे रमेशजी उपाख्य राजाभाऊ कंडारकर दररोज सकाळी ४ ते ७ या वेळात योगा -सने , सूर्यनमस्कार,योगसाधकांना शिकवतात आज गाडगे महाराज जयंती निमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात सर्वप्रथम सामुहिक प्रार्थना – ‘ हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे – घेण्यात आली

शहर परिसरातील काही भागांमध्ये साफसफाई मोहीम राबविण्यात आली.त्यानंतर विविध स्पर्धा – निंबू चमचा , आंधळी कोशिंबीर , उल्टे जलद चालणे , गाढवाला शेपूट लावणे , संगीत खुर्ची , तीन पायांची शर्यत , बादलीन चेंडू टाकणे व शेवटी रस्सिखेच ‘ घेण्यात आली .सर्व योग साधकांनी यातभाग घेतला.त्यानंतर केक कापुण व सत्कार समारोह झाला.योगशिक्षक राजाभाऊ कंडारकर यांचा सर्व सदस्यांनी शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार केला

.सोबतच प्रशिक्षक – सौ .संगीता वराडे ,सौ तनुश्री सुपे व श्री पवार यांचाही कंडारकर कुटुंबाकडून तीनही प्रशिक्षकांचा सत्कार ‘ स्मृती चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .तसेच दुपारी आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीससांचे वाटप करण्यात आले .

नंतर सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश काकर , वराडे सर , नारखेडे सर,सौ.सुपे ,प्रतिक्षा वराडे , मनिषा टिकार.सौ अर्चना डावखरे,सौ.देशमुख सौ भारती काकर पाटील यांच्यासह सर्व महिला योगसाधकांनी पश्चिम घेतले. अशी माहिती रमेश काकर पाटिल यांनी निर्भिड स्वराज्य ला दिलेल्या प्रेसनोटच्या माध्यमातून दिली आहे.

Related posts

बाजार समितीच्या शिष्ट मंडळाने घेतली उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांची भेट

nirbhid swarajya

अर्धा पावसाळा गेला तरी फॉगिंग मशीन बंदच

nirbhid swarajya

जिल्ह्यात 2 उपविभागीय महसुल अधिकारी व 1 उपजिल्हा निवडनूक अधिकाऱ्याची बदली

nirbhid swarajya
error: Content is protected !!