मुंबई : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरी केली जाते. या सद्भावना दिनी मुंबई काँग्रेसने सुदृढ बालक, सुपोषित मुंबईसाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने मुंबई काँग्रेस तर्फे मुंबईतील ‘१२२४ कुपोषित बालक पोषण आहार दत्तक प्रकल्पाचा शुभारंभ’ आणि ‘पोषण पुनर्वसन केंद्राचे (NRC) उद्धाटन’ करण्यात आले. या कार्यक्रमास दुरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री अँड. यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी शिक्षणमंत्री प्रा वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते. यावेळी बोलताना अँड ठाकूर म्हणाल्या, आज मी एकाच वेळी नागपुर आणि मुंबई या दोन ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित आहे.
स्व. राजीवजी गांधी यांनी सुरु केलेल्या डिजिटल युगात आपण आहोत. आजचा दिवस ‘सद् भावना दिन’ म्हणून साजरा केला जातो. गरजू लहान मुलांच्या प्रगतीसाठी आणि चांगला समाज घडवण्याच्या प्रती जी आपली तळमळ आहे, खरी भावना आहे, ती या कार्यक्रमातून सद्भभावना दिनी व्यक्त होत आहे. त्याबद्दल मी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे अभिनंदन करते. आणि आभार ही व्यक्त करते की, माझा महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन ज्यासाठी प्रयत्नशील आहे त्या सुपोषित महाराष्ट्र घडविण्यात आपण पुढाकार घेत आहात. भविष्यातील तरुण पिढीला सुदृढ करण्यासाठी आपल आजचं योगदान लाख मोलांच आहे. मुंबईसाऱख्या काँस्मोपाँलिटियन शहरात हरएक प्रकारची माणसं आहेत, विविधता आहे तशा अडचणी ही आहेत. गरीबी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव यामुळे कुपोषणाचा प्रश्न ही असल्याच त्यांनी सांगितल. मुंबईत ही ICDS नागरी विभाग, अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. आईच्या मायेने बालकांची काळजी घेतली जाते. शासनाच्या प्रयत्नांबरोबरच गरज आहे समाजाच्या पाठिंब्याची, जनजागृतीची. आमच्या प्रयत्नांना आज मुंबई काँग्रेसची साथ मिळतेय. आपण सुपोषित मुंबईच लक्ष्य लवकरच गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरी भागात आज आपण NRC चे ही उद्धाटन करतोय. खुप मोठं योगदान यानिमित्ताने सुपोषणाच्या अभियानाला मिळेल. अतिशय सुंदर, सुशोभित, मुलांच्या मानसिकतेचा विचार करुन मुंबई महानगरपलिकेने सेंटर तयार केलेलं आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच एकत्र येणं आहे हे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचं आणि योग्य पाउल असल्याच त्या म्हणाल्या. दोन महिन्यांपूर्वी, १९ जून ला, राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून मुंबई काँग्रेसने १००० बालकांना पोषणासाठी दत्तक घेतल आणि आज परत त्याच्या पुढचं पाउल आपण उचललं आहे. या शाश्वत, सतत प्रयत्नांसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि पुर्ण मुंबई काँग्रेस टीमच अभिनंदन त्यांनी यावेळी केलं.