खामगाव : सुटाळा बु ते नांदुरा बायपास पर्यंत तरुणाई फाउंडेशन खामगाव, हिंदुस्तान युनिलिव्हर परिवार ,गोपाल कृष्ण नगर मधील नागरिक आणि सुटाळा बु निवासी यांनी मिळून हे वृक्षारोपण केलेले आहे. यामध्ये कन्हेर बोगनवेल, बीट्टी, टिकोमा, पिवळा कन्हेर अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.तीन दिवसापासून रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम तरुणाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यामध्ये प्रामुख्याने खड्डे खोदणे त्यात झाडे लावणे त्याला टेके लावणे हे सर्व काम सेवाभावी म्हणून या संस्था करीत असतात.आता नागरिकांची जबाबदारी आहे की ते सर्व झाडे सुरक्षित ठेवून त्यांची वाढ कशी होईल याकडे लक्ष देणे.तसेच या लावलेल्या झाडांपैकी रस्त्याने जा ये करणाऱ्या लोकांनी किंवा अन्य नागरिकांनी हे झाड उपटून घेऊन जाऊ नये याची दखल घ्यायची आहे. या झाडांचं संरक्षण करणे आपली जबाबदारी असून हे झाड जेव्हा वाढतील तेव्हा या रस्त्याची शोभा आणखीन वाढेल आणि रस्त्याचं सौंदर्य आणखी खूलून दिसेल . सुटाळा बु तर्फे तरुणाई फाउंडेशन आणि हिंदुस्थान परिवाराचे यावेळी आभार मानण्यात आले.