खामगाव दि 4 नोव्हेंबर 2021 दिवाळी लक्ष्मी पूजन च्या निमित्ताने सुटाळा बु गावातील आशा सेविका यांनी कोरोना काळात ही घरोघरी जाऊन योग्य ती माहिती लोकांना नागरिकांना पुरविली ज्या कोरोना सारख्या महा भयंकर परिस्थिती मध्ये लोक घरा बाहेर पडण्यास सुद्धा घाबरत होते अश्या परिस्थिती मध्ये सुटाळा बु गावातील आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन तपासणी करून योग्य ती माहिती देण्याचे काम त्यांनी केले. खरे तर कोरोना योद्धा म्हणायला काही हरकत नाही . कोरोना महामारी पासून सर्व व्यवहार असो ,इतरही सर्व काही ऑनलाईन झाले आहे , या ऑनलाईन च्या युगात आशा सेविका यांच्या जवळ मोबाईल असणे गरजेचे आहे, पण त्यांना कुठलेही मानधन लागू नसल्याने सर्वच मोबाईल घेऊ शकत नाही अशा अनेक अडचणी त्यांना येत होत्या ,या करिता त्यांनी सरपंच ग्रामपंचायत सुटाळा बु यांना पत्रा द्वारे मोबाईल ची मागणी केली होती. त्यांची अडचण लक्षात घेता. त्यांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून आज दिवाळी भेट म्हणून सुटाळा बु गावातील 5 आशा सेविका यांना मोबाईल भेट आणि मिठाई देण्यात आली. यावेळी सरपंच श्रीकांत वानखडे, उपसरपंच नारायण ठाकरे,ग्रामसेवक अनंता हिरळकार, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर दुतोंडे, पुंडलिक वानखडे, दिलीप कळस्कार,मोहन घुईकर,रविंद्र भोपळे,ज्ञानेश्वर दबडघाव, विजय हिवराळे,विनोद भोपळे,नरेश भलावी, संतोष बगाडे,रमेश मोरे, दिनेश इंगळे,महादेव बनकर,सुनील वानखडे, ग्रामपंचायत लिपिक ज्ञानदेव वानखडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते“`~
previous post