खामगाव : येथून जवळ असलेल्या सुटाळा खुर्द ग्रामस्थांनी दीड वर्षाच्या चिमुकल्याचे प्राण वाचवल्याने दोन युवकांचा सत्कार करण्यात आलंकाही दिवसाआधी सुटाळा खुर्द मध्ये समर्थ बोंबटकार हा दीड वर्षाचा बालक अंगणात खेळत असताना अंगणात ५० फूट विहिरीत पडला होता. त्या बालकाला वाचण्यासाठी गावातील सचिन गावंडे व नंदू अत्तरकार या दोन युवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता विहिरीत उतरून त्या दीड वर्षाच्या चिमुकल्याचे प्राण वाचवले होते. यावेळी संपूर्ण गावात त्यांच्या धाड़साची प्रशंसा करण्यात आली होती. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा याकरिता सुटाळा खुर्द ग्रामस्थांनी त्यांचा हार घालून सत्कार केला आहे. यावेळी सुटाळा खुर्द गावातील प्रल्हाद रोठे,सचिन ठाकरे, बंडू बोदडे, राजेश जवरे, गोपाल बोचरे, पप्पू वेळूकर, महादेव घाटे, अमोल बोचरे यांच्यासह आदी उपस्थित होते.
previous post