खामगांव : कोविड 19 नियंत्रणासाठी व बाधित लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे .अश्यातच सुटाळा खु. च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल सचिन ठाकरे यांच्या पुढाकारातून वार्ड क्र.२ च्या सर्व नागरिकांची कुटूंबाचा आरोग्य तपासणी सुरु केली आहे. वार्ड क्र.२ मधील कुटुंबांचा घरोघरी जाऊन ऑक्सीजन लेवल तपासणी व टेम्प्रेचर ची तपासणी करण्यात येत आहे. सदर आरोग्य तपासणी आशा वर्कर रेखा महादेव राऊत व आंगनवाडी सेविका आशा दहिभाते (ढोरे) यांनी ऑक्सीजन लेवल तपासणी व टेम्प्रेचर ची तपासणी करत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेने स्वतःचे संरक्षण स्वतः करायचे आहे. घरातून बाहेर जाताना मास्क,चा वापर करावा ,हॅन्ड ग्लोज , सॅनिटायझरचा यांचाही वापर करावा ,सोशल डीस्टनसिंग चा वापर करणे, कोरोना प्रतिबंधात्मक माहिती सुटाळा खु. ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल सचिन ठाकरे यांच्या पुढाकारातून घरोघरी जाऊन दिली जात आहे. थर्मस स्कॅन मशीन द्वारे व्यक्तीच्या शरीरातील तापमान किती आहे याची माहिती घेतली जाते. ऑक्सी मिटर मधून शरीरातील ऑक्सीजन ची लेव्हल किती आहे याची तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. याबाबतही सुटाळा खु. च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल सचिन ठाकरे घरोघरी जाऊन जनजागृती करत आहे. या मोहिमे मध्ये गावातील जनतेने चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळत आहे. यावेळी सचिन ठाकरे ,अभिजीत ठाकुर,पवन ठाकुर,सचिन गावंडे आदि उपस्थित होते.
previous post