पाच वर्षांपासून जोपासत आहे सामाजिक बांधिलकी
खामगांव : दि.८ एप्रिल रोजी सिल्व्हरसिटी रूग्णालयाचा ५ वा वर्धापन दिन रक्तदान शिबीर आयोजीत करून साजरा करण्यात आला. ८ एप्रिल २०१६ ला गुढीपाडवाच्या शुभ मुहुर्तावर सुरू झालल्या सिल्व्हरसिटी रूग्णालयाला ५वर्षे पुर्ण झाली. बुलढाणा जिल्हातील सर्व सोयीयुक्त सर्वात मोठया रूग्णलयाची संकल्पना डॉ.भगतसिंग राजपुत व डॉ . गौरव गोयनका यांनी मांडली ही संकल्पना वास्तव रूपात उतरविण्या करीता त्यांना साथ लाभली चेअरमन डॉ प्रशांत कावडकर ,मॅनेजींग डेरेक्टर डॉ.अशोक बावस्कर ,संचालक डॉ. पंकज मंत्री ,डॉ. निलेश टिबडेवाल ,डॉ. मनिष अग्रवाल डॉ.गणेश महाले ,डॉ. पराग महाजन, डॉ.गौरव लढढा, डॉ.आनंद राठी, शेअर होल्डर डॉ.सतिष गोरे, डॉ.गुरूप्रसाद थेटे, डॉ. प्रविण पाटील, डॉ.ब्रम्हानंद टाले, डॉ.अख्तर हुसेन, डॉ.रमेश मुंदडा, डॉ.राजेंद्र गोटी डॉ. ए .जाधव व इतर डॉक्टरांची समर्थ साथ लाभली. मागील ५ वर्षात इमरजेन्सी पेशंटला या रूग्णालयात वेळेवर उपचार देऊन त्या रुग्णाचे प्राण वाचवले आहे. यात हार्ट अटॅक, सर्पदंश, विषबाधा, अपघात ,हेड इन्जुरी ,स्पाईन इन्जुरी, चेस्ट इंन्जुरी, तसेच इक्लामशिया डिलेवरी या सारख्या असंख्य रूग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी केले आहे .बुलडाणा जिल्ह्यात सिल्वरसिटी रूग्णालय घाटाखालील अत्यावश्यक व गंभीर आजारी रूग्णाकरीता नवसंजीवनी ठरत आहे. या व्यतिरीक्त सांधेरोपन मुतखडयांचे दुर्बिनीद्वारे ऑपरेशन, दुर्बिणीदवारे ऑपरेशन ,ऑरथोस्कोपीक सर्जरी, पेल्व्हीक फेक्चर सर्जरी सुदधा या रूग्णालयात उत्तम प्रकारे अतिशय माफत दरात रुग्णाला देत आहे .मागील पाच वर्षात वेळोवेळी सिल्व्हरसिटी प्रशासनाने आपली सामाजीक बांधलिकी उत्तम प्रकारे जोपासली आहे. उदघाटन प्रसंगी होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजाचे काही देणे लागते या उद्देशाने २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना २०००० रू. प्रत्येकी मदत असे ५ लक्ष्य रूपये शेतकरी कुटुंबांना वाटप करण्यात आली. तसेच पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्त साधून महाराष्ट्रात सुदधा कोरोना ग्रस्त महाराष्टात रक्ताचा भयंकर तुटवडा आहे यांची जानीव ठेवुन एक सामाजीक समजुन राज्य सरकार यांच्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान शिबीराचे आयोजन जेसिआय खामगांव, जय अंबे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यात रक्त संकलन ठाकरे ब्लड बँक अकोला यांनी केले या शिबीरात एकूण २४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी व रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते . या शिबीरांच्या यशस्वीतेकरीता डॉ.अनुप शंकरवार डॉ. गिरीष पवार जेसीआय खामगांव, जय अंबेच्या अध्यक्ष सौ.शालीनी राजपुत जेसी योगेश खजी जेसी अँड.रितेश निगम, जेसी रोहन जैस्वाल, जेसी निखील लाठे, जेसी अॅड. राहुल पवार, डॉ.उदय राजपुत व सिल्व्हरसिटी रूग्णालयांच्या सर्व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले .