November 20, 2025
आरोग्य गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

सिने कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्यावतीने ड्रग्जभूषण पुरस्कार

ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांनी मिळालेले सर्वोच्च पुरस्कार परत करावे.
बुलडाणा : करोडो चाहत्यांना आपल्या अदाकारीने भुरळ पाडणार्‍या परंतु ड्रक्स प्रकरणात मलीन झालेल्या कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्यावतीने ड्रग्जभूषण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे.
अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालून चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात येईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.भारतासह जगातील कला, खेळ, विज्ञान यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिभावंतांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहर ,अमिताभ बच्चन ,दिलीप कुमार,कंगना रणावत,एकता कपूर ,अदनान सामी,सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री अवार्ड देण्यात आलेला आहे.तर करण जोहर ने आयोजित केलेल्या ड्रक्स पार्टीमध्ये ड्रक्स वापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झालेले आहे.त्यामुळे करन जोहरसह ड्रक्स प्रकरणात ज्या कलाकारांची नावे आलेली आहे. ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीतील दुसरे नाव म्हणजे सारा अली खान असून सारा आली खान यांनाही उत्कृष्ट अभिनेत्री चे दहा पुरस्कार मिळालेले आहेत.तर आजपर्यंत देशाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कलाकारांची आणखी काही नावे ड्रक्स प्रकरणात चौकशीत समोर येऊ शकता,त्यामुळे ड्रक्स प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन निर्दोष सिद्ध होईपर्यंत देशाने प्रदान केलेले सर्वोच्च पुरस्कार सरकारला परत करण्यात यावे. अन्यथा अशा कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्या वतीने ड्रग्स भूषण पुरस्कार देऊन निषेध करण्यात येणार असल्याचे आझाद हिंद संघटनेने जाहीर केले आहे.

Related posts

पर्यायी पूल गेला वाहून ; ट्रॅक्टर बचावला

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन च्या वतीने वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

nirbhid swarajya

गजानन महाराज संस्थानतर्फे आयसोलेशनाठी ५०० खाटांची व्यवस्था

nirbhid swarajya
error: Content is protected !!