खामगांव : येथील सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस़ खामगांव ला राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायतन परिषद म्हणजेच नॅकच्या कमीटीने दि.०९ व १० मार्च २०२१ रोजी भेट देऊन पाहणी केली. या नंतर आज नॅक कमेटीने सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्प़स ला “ब” दर्जाचे मानांकन देऊन सन्मानीत केले आहे. तालुकास्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दृष्टीने ही अभिमानास्प़द बाब आहे.मागील जवळपास एक दशकापासून खामगांव सारख्या तालुकास्तरावर वसुंधरा बहुउददेशीय सामाजिक संस्था खामगांव व्दारा खामगांव व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातून उच्च़ व तंत्रशिक्षण देण्याचा संकल्प़ केला. त्यानुसार खामगांव जवळील शिरसगांव निळे येथे जवळपासस १० एकरात सिध्दी विनायक टेक्नीकल कॅम्पस़ उभे राहीले. भव्य़ अशी इमारत,स्वच्छ़ व सुंदर परिसरात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याची सुरुवात झाली. हया अभियांत्रिकी महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभियांत्रिक अभ्यासक्रमातून शिक्षण घेतले असून शेकडो विद्यार्थी देशभरातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उच्च़ पदावर नोकरी करीत आहे. शिक्षणाचा उच्च़ दर्जा व त्यानंतर कंपनींमध्ये नोकरीकरीता घेण्यात येणाऱ्या कॅम्प़ मधून मोठ मोठया नामांकित कंपन्यामध्ये या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोक-या लागल्या आहेत. दि.०९ व १० मार्च २०२१ रोजी नॅक कमेटीच्या भेटींनतर सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्प़सला शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचा समजला जाणारा नॅकचा “ब” दर्जा मानांकन प्राप्त़ झाला सिध्दी विनायक टेक्नीकल कॅम्प़स़मध्ये एका नामांकित महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध़ असल्यामुळे सदरचा दर्जा प्राप्त़ झाला आहे. यात महाविद्यालयातील प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी आवश्यक़ असलेली स्वतंत्र प्रयोग शाळा, आकाश टॅबचे संशोधन केंद्र, एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना), तसेच स्वच्छ़ सुंदर व वृक्ष संवर्धन केलेला असा परिसर व त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे चांगले शैक्षणिक वातावरण यातून हे मानांकन ठरत असते. सिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्प़सला नॅकचे “ब” मानांकन मिळाल्याबदद़ल संस्थेचे अध्यक्ष श्री सागर फुंडकर, यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या महाविद्यालयाला मिळालेल्या “ब” दर्जा मानांकनाबददल प्राचार्य, शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.
previous post