खामगांव : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांची खाजगी हॉस्पिटल्स कडून अक्षरशः लूट सुरू आहे. खामगाव मध्ये तर असे प्रकार वाढले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र येथे कोरोनाची भीती दाखवून लोकांची काही खाजगी डॉक्टरांकडून लूट सुरू आहे. कोरोना काळात खामगावात शहरात रेडिओलॉजिस्ट व एम डी डॉक्टरांकडून चेस्ट सिटीस्कॅन च्या नावाखाली रुग्णांची लुट होत असल्याचे समोर आले आहे.

यात डॉक्टर सिटीस्कॅन साठी रुग्णांकडून रुग्णांकडून जास्त पैसे उकळत आहेत.आता या आणीबाणीच्या काळात डॉक्टरांवर रुग्णांना प्रामाणिक सेवा देण्याची जबाबदारी असताना खामगाव शहरातील काही डॉक्टरांनी मात्र यात आपला धंदा सुरू करण्याची संधी शोधली आहे.लॉकडाऊन मुळे सध्या अतिशय बिकट परिस्थिती आहे, उत्पन्नाचे मार्ग नसल्यामुळे सर्व सामान्य लोकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितित लोकांना धीर देण्याचे सोडून खाजगी रुग्णालय लूटमार करत असतील तरी यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकते