मुंबई: राज्य सरकारने आता सिटीस्कॅनचे दर निश्चित केले आहे.त्यामुळे तपासणीसाठी ३ ते ४ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारता येणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.खाजगी रुग्णालयात किंवा तपासणी केंद्राकडून सिटीस्कॅनसाठी अवाजवी दर आकरण्याबाबत अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.सरकारने याची दखल घेत सिटीस्कॅनच्या दरनिश्चितीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार समितीने सादर केलेला अहवाल सरकारने मान्य करत 16 स्लाईड पेक्षा कमी सिटीस्कॅन साठी अडीच हजार रुपये तर 64 पेक्षा जास्त असणारे सिटीस्कॅन यासाठी तीन हजार रुपये आकारता येतील. यापेक्षा जास्त किंमत आकारली तर कारवाईचा करण्याचा इशारा सुद्धा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. या सिटीस्कॅनमधे निर्जंतुकीकरण, पी पी ई किट, सिटी फिल्म, जीएसटीचा या दरामध्ये समावेश असणार आहे.तसेच आरोग्य विमा असणारे रुग्ण किंवा रुग्णालय, कॉर्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू होणार नाही अशी सुद्धा यावेळी सांगितले.