लाखनवाडा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने ग्रामीण रुग्णालय लाखनवाडा येथे दिनांक १८-०७-२२ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सुनीताताई विजय खंडारे ह्या होत्या तर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संतारामजी तायडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष वामन गुडेकर जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनोणे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर प्रतिष्ठित नागरिक शिवाजी पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुफरान उल्लाखान सलीम खान उपसरपंच प्रकाश इंगळे ग्रामपंचायत सदस्य अाबिद खान देवानंद बोचरे प्रल्हाद हटकर हेमलता मार्तंड नवल पांढरे फिरोज खान शेख अफरोज उल्हास पांढरे विजय खंडारे मधुकर वाकोडे अनिल मारकड शामराव मारकड आबिद खान उपस्थित होते तसेच मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथील जनसंपर्क अधिकारी विश्वकर्मा वेलकर विजय राजपूत डॉक्टर ऋषिकेश राजपूत डॉक्टर सुरेंद्र तोमर डॉक्टर शेखर पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले तसेच लाखनवाडा परिसरातील बहुसंख्य लोकांनी लाभ घेतला