शेगाव: टाकळी नागझरी येथील २५ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टाकळी नागझरी येथील अनुराधा किशोर फुटकर वय पंचवीस वर्ष या विवाहितेने चला सासरच्या मंडळीकडून पुण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ११ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली याबाबत श्रीराम रामदास ठाकरे व ५३ यांनी आज ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांची मुलगी अनुराधा हिचा विवाह टाकळी नागझरी येथील किशोर श्रीकृष्ण फुटकर सोबत झाले आहे तिला तिचा पती किशोर श्रीकृष्ण फुटकर सासू सत्यभामा फुटकर दोघे राहणार टाकळी नागझरी,सौ प्रतिभा विद्याधर आढाव , सोनू चतारे राहणार घाटपुरी खामगाव यांनी फिर्यादीची नात कुमारी भूमिका हिच्या शाळेची हीच दहा हजार रुपये माहेरून आन असे म्हणून तसेच तुला काही काम धंदा येत नाही तू काही कामाची नाही तू माहेरी निघून जा असं सांगून संगणमत करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून तिच्या राहत्या घरी टाकळी नागझरी येथे गळफास लावून आत्महत्या केली या तक्रारीवरून उपरोक्त चार जना विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी कलम ३०६,४९८,३४भा द वि नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश डाबेराव करीत आहेत.