खामगाव:- नुकतीच महाराष्ट्र शासनाने सावित्रीमाई फुले यांची जयंती ३ जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केली असून. ३ जानेवारी सावित्रीमाई जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे सावित्री जिजाऊ यांच्या विचारांवर, कृतीवर प्रकाश टाकण्यासाठी क्रांतिसूर्य न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून डिजिटल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन सौ. शेफालिताई समीर भुजबळ यांच्या हस्ते सावित्रीमाई यांचे जन्मगाव नायगाव येथून ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात येणार आहे व्याख्यानमालेची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल.३ जानेवारी २०२१ – उद्घाटन सौ. शेफालीताई समीर भुजबळ.व्याख्यान – काविताताई कर्डक “सावित्रीमाई आणि आजची स्त्री” सकाळी ९.३० वाजता.४ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता साक्षीताई बेले (अमरावती) – “सावित्रीमाईंचे विचार व कार्य” ५ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता सुनिताताई काळे (यवतमाळ)- “सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महानायिका व आजच्या स्त्रीची भूमिका” ६ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता सपनाताई माळी (उस्मानाबाद)- “सावित्री-जिजाऊंचा वैज्ञानिक दृष्टीकोन”७ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता सीमाताई एकतपुरे (अकलूज)- “प्लेगमधील सावित्रीमाईचे जीवाचे राण”८ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता पुजाताई खैरनार (पुणे)- “सावित्रीमाई आणि शिक्षण वारसा” ९ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता कविताताई मेहेत्रे (म्हसवड)- “मी सावित्रीमाई बोलतेय”१० जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता
लताताई खाडे (मुंबई)- “सावित्रीमाई चे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व”११ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता निशाताई फुले (पंढरपूर)- “सामाजिक परिस्थिती आणि आजची स्त्री”१२ जानेवारी २०२१-रात्री ८.०० वाजता मोनिकाताई काळे (अकोट – अकोला)- “जिजाऊ सावित्रिंचा संघर्ष लढा”सदर व्याख्यानमालेचे आयोजन समता परिषदेच्या वतीने करण्यात आले असून क्रांतिसूर्य न्यूज अँड व्ह्यूज(www.youtube.com/KrantisuryNewsViews) या यूट्यूब चॅनेल वर आपल्याला हे कार्यक्रम दिलेल्या वेळेत लाईव्ह पाहता येणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने संपूर्ण कुटुंबासह या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक अनिल नळे नाशिक, प्रा.संतोष विरकर औरंगाबाद, प्रविण बोचरे खामगाव,. सपनाताई माळी पुणे, परमेश्वर बनकर बीड, मोनीकाताई काळे, अकोट, पूजाताई खैरनार पुणे,सिमाताई एकतपुरे अकलूज यांच्यासह समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
previous post
next post