खामगांव : संपूर्ण खामगाव शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयाततील संपूर्ण व्यवस्थेचा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. यावेळी निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे व रुग्ण सेवा समितीचे संजय शिंनगारे व राम मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी नवीन स्वब टेस्टिंग मशीन तसेच नव्याने उपलब्ध झालेले 17 व्हेंटिलेटर यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली व रूग्णालयाला आवश्यक असलेल्या इतर साहित्य व औषधे व उकरणे याबद्दल आढावा घेतला यावेळेस आमदार आकाश फुंडकर यांनी रुग्णालयात स्वच्छता राखणे बद्दल निर्देश दिले