खामगाव:-मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, हा मोलाचा संदेश देण्यासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील परिचारिकांनी पुढाकार घेत मकर संक्रांतीचे औचित्य साधून मातेला साडी-चोळी आणि बाळाला झबला देत कन्या जन्माचे स्वागत केले होते. यावेळी सकस आहाराचे वाणही महिलांना देण्यात आले होते. स्त्री जन्मदरात बुलडाणा जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत दर बुधवारी सामान्य रुग्णालयात कन्या जन्माचे स्वागत या पध्दतीने केले जात आहे.आज दिनांक 26 फेब्रुवारी 2020 बुधवार रोजी या उपक्रमामध्ये खामगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माळी समाज महिला मंडळ यांनी सहभाग घेऊन सामान्य रुग्णालयातील मातेला साडी-चोळी व सकस आहार तसेच बाळाला झबला देत कन्या जन्माचे स्वागत केले. सामान्य रुग्णालयाचा हा उपक्रम असून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माळी समाज महिला मंडळ यांच्या सारख्या सामाजिक संस्था या उपक्रमात सहभाग घेत आहेत ही बाब प्रशंसनीय आहे. या कार्यक्रमाच्या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माळी समाज महिला मंडळच्या अध्यक्षा सुरेखा धनोकार, सुनंदा धनोकार, मालाताई धनोकार, ज्योती धनोकार,शारदा म्हसने, सूनिताताई घाटोळ, वैशाली पल्हाडे, रेखाताई म्हसने, वनश्री भिसे, उषा वाडोकार, महानंदाताई घाटोळ, संगीता लोखंडे, नलिनी चिंचोळकार,सुरेखा धनोकार, सुशिलाताई म्हसने, सुरुची नावकार तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे,अधिपरीचारीका सुमित्रा राउत यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी परिचारिकांची उपस्थिती होती.