देऊळगाव राजा : संपुर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून वैद्यकीय यंत्रणा या संकटासमोर हतबल झालेली आहे. अद्यापही कोणत्याच देशाला यावर औषधी चे संशोधन करण्यात यश मिळाले नसून जी उपलब्ध औषधी आहे तीच औषधी देऊन उपचार सुरू आहे, अनेक कोरोना रुग्णांना याचा फायदा झालेला दिसून येत आहे. तर अनेकांनी आपला जीव गमावला आहे, या संकटाचा सामना करण्यासाठी सगळीकडे वैद्यकीय चमू अहोरात्र परिश्रम घेत आहे. स्थानिक ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आसमा शाहीन यांनी त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या ५५ अधिकारी व कर्मचाऱ्याकरीता पीपीई किट वाशेबल चे स्वखर्चाने वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून एक महिला असतांना कोरोना सारख्या संकटाला हिमतीने सामोरे जाऊन आपणही या समाजात वावरात असून आपणावर सुद्धा या जिजाऊंच्या माहेर घरी राहत असतांना समाजाचे काहीतरी देणे लागते ही भावना मनात ठेवून त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवताना त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी व सेफ्टीसाठी पीपीई किट चे वाटप केले त्यांच्या या दानशूर वृत्तीला सर्व समाजातून अभिनंदन होत आहे, त्यांचे हे समाजभिमुख कार्य पाहून अनेक दानशूर व्यक्ती समोर येत आहे व शक्य तेवढी मदत सुध्दा आहेत.
previous post