मुस्लिम धर्माची शिकवण समजून घेण्याची गरज:-मजर पठाण
खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथे रमजान महिन्यानिमित्त गावातील सर्व धर्मीयांना बोलवून आगळ्या वेगळ्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवून आणले मुस्लिम समाजामध्ये रमजान महिन्याला फार महत्व आहे या महिन्यांमध्ये मुस्लिम समाज बांधव एक महिना उपवास करून महिना उत्साहात साजरा करत असतात यामध्ये सर्व समाज व धर्मियांना मुस्लिम समाजा विषयी माहिती व्हावी मुस्लिम समाज काय आहे त्याचा उद्देश काय आहे मानव कल्याणासाठी कशा प्रकारे सामाजिक काम केले जाते मज्जित मध्ये जाऊन मज्जित चा परिचय सुद्धा करून घ्यावा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम जे चुकीच्या पद्धतीने केले जाते अशांना सुद्धा रोखण्याची काळाची गरज असल्याचे मत एजाज भाई यांनी व्यक्त केले ही सर्व माहिती सर्व समाज बांधवांना सांगण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गावातील सर्व समाज असतील धर्म असतील यांनी सहभागी होऊन कार्यक्रमांमधून सामाजिक बंधुभाव जोपासण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही करण्यात आले एक मेका धर्माप्रती असलेली दुरू कमी व्हावे यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये मजर पठाण उपसरपंच सय्यद एजाज,अन्सार भाई,सय्यद सुभान, यासह इतर समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी धर्माजी सुरवाडे भीमराव सुरवाडे गोपाल महाराज टिकार यासह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते