खामगाव : कोरोना संकटात संपुर्ण जग होरपळून जात असतांना महाराष्ट्रात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर महाराष्ट्राला या संकटातून वाचवणे हे मोठे आव्हान ऊभे असतांना मुख्यमंत्री या आव्हान समर्थ पणे पेलत आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणा-या मुख्यमंत्र्याना आर्थिक आधार देण्यासाठी सामाजिक दायित्वातून एका एसटी वाहकाच्या पत्नीने मुलाच्या शिक्षणासाठी काटकसर करुन बचत केलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे.
https://twitter.com/NirbhidS/status/1248571030014021634?s=19
ईतर अस्थापनांपेक्षा पगार कमी असुन सुद्धा खामगाव आगारात वाहक पदावर कार्यरत असलेले तसेच महाराष्ट्र एसटी कामगार सेना बुलडाणा विभागाचे विभागीय सहसचिव श्री संदिप पाचपोर क्र. ११७५ यांच्या पत्नी सौ. रेणु संदिप पाचपोर यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी घर खर्चात काटकसर करुन बचत केलेले १० हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यकता निधीत जमा केला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.