मेहकर: तालुक्यातील जानेफळ येथे कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मेहकर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी स्वखर्चाने जानेफळ येथील आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, पोलिस विभाग,पत्रकार बांधव ग्रामपंचायत कर्मचारी, सलुन व्यावसायिकांना व्यापारी बांधवांना 60 हजार रूपयांच्या 100 फेस शिल्ड मास्क, व 500 मीलीच्या 300 सॅनिटायझरचे बॉटलचे वाटप जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात सोशल डिस्टंन्स ठेऊन वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी फेस शिल्ड मास्क, व सॅनिटायझर वाटप करण्याच्या मागची भुमीका सांगितली तर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कृष्णा हावरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.