April 19, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

साफसफाई बाबत नागरिकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक १२ मधे दुर्लक्ष

खामगांव : स्थानिक दाळफैल भागातील सार्वजनिक शौचालय असल्याने तेथे योग्य ते साफसफाई करत नसल्याने दालफैल भागातील अशोक क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने खामगांव नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याबाबत वेळोवेळी तक्रार करून सुद्धा तक्रारिची दखल घेतली जात नाही. या भागात घाणीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे, तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध ठिकाणी डबके साचले आहेत.

या सर्वामुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे. या भागात असलेल्या शौचालय धुण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नाही. या शौचालयाचा उपयोग मधे दाळफैल, गवळी पुरा,शौकत काॅलनी व इतर भागातील नागरिक करतात. शौचालयामधे लाईट ची व्यवस्था सुध्दा नाही त्याकारणाने महीला,व पुरुष यांना उघड्यावर शौचाला जावे लागते. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितले असता कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात.

सोबत चिखली रोडजवळ असलेली बौद्ध स्मशान भूमी येथे प्रेत जाळण्याकरिता पिंजर नसुन ते सुद्धा बसवून देण्यात यावे असे सुद्धा सदर निवेदनात सांगितले आहे. तरी लवकरात लवकर या भागातील समस्या दूर करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे. हे निवेदन देते वेळी सुनिल सरदार, कपिल तायडे, लखन हेलोडे,अमन हेलोडे,नवल वाकोडे, मारोती मोरे, अनिल जाधव, हितेश इंगळे प्रथम सरकटे, सुमित मोरे व सर्व नागरिक उपस्थित होते.

Related posts

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 304 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसम ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!