शेगावच्या एका तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
शेगांव : धामण जातीच्या सापाला मारून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे शेगावच्या युवकाला चांगलेच भोवले आहे. त्याचे विरुद्ध खामगाव (प्रा.) वनपरिक्षेत्र विभाग यांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या शेगांव शहर येथील जमजम नगर भागात मोहम्मद शफीक मो. शरीफ यांनी दिनांक-७ जुलै रोजी धामण जातीय सापाला मारुण फोटो सोशल मीडीयावर व्हायरल केले होते.
याबाबतची माहीती वनविभागाला मिळताच बी.के.डी.पढोक, वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल-. डी.जी.शेगोकार, एस.आर.गिरणारे वनरक्षक संदेश कुलट , जी.बी. पालवे, एस.एम.कडपे खामगांव (प्रा.) वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथकाने आरोपी मोहम्मद शफीक मो.शरीफ यांचे विरुद अप.क्र.६८९ /१३ वन्यजीवन कायद्या अनव्ये गुन्हना दाखल करून प्रकरण चौकशी वर ठेवण्यात आले, वन्यजीवन 1972 कायद्या अंतर्गत साप वन्यजीका कायद्याच्या सेडगुल (2) मध्ये समाविष्ट आहे. सदर कार्यवाही वनविभागाचे एस.एम.माळी उपवनसंरक्षक, वनविभाग बुलढाणा, एस.एस.गायकवाड, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा. कैम्पा) , बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पनपरिक्षेत्र (प्रा.), कार्यालय खामगाव मधील अधिकारी / कर्मचारी यांनी पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास .के.डी.पडोळे वनपरिक्षेत्र अधिकारी(प्रा)खामगाव,डी.जी.शेगोकार वनपाल हे करीत आहे.