खामगांव मतदार संघातील ग्राम महाविकास आघाडीच्या नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांचा ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते सत्कार
खामगांव :ग्रा. पं. निवडणूक ही अत्यंत जिकरीची व कठीण निवडणुक मानली जाते. या निवडणुकीमध्ये मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या राणा दिलीपकुमार सानंदा यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीला विश्वासात घेऊन निवडणुक लढविली व मतदार संघातील ९० टक्के ग्राम पंचायतीवर काँग्रेस व मित्र पक्षाचा झेंडा फडकविला आहे ही बाब अभिमानास्पद असुन नवनियुक्त ग्रा.पं. सदस्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातुन आपले गांव आदर्श गांव बनवावे, महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘‘मी समृद्ध गांव समृद्ध’’ योजनेसह इतर योजनेतून ग्राम विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जाईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्क मंत्री ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर यांनी केले.
काल २३ जानेवारी २०२१ रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेगांव रोडवरील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर येथे नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे व सत्कार मुर्ती मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेशभाऊ एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, जि. प. अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई पडघाण, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, महाराष्ट्र मागासवर्गीय सेलचे प्रदेश अध्यक्ष विजयभाऊ अंभोरे, महिला प्रदेश सरचिटणीस डॉ. तबस्सुम हुसैन, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ कायंदे, एन.एस.यु.आय. चे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. बळीराम मापारी, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख सुरेश वावगे, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा, धनंजय देशमुख, न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोश देषमुख, रामकृश्ण पाटील, राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना ना. यशोमतीताई ठाकुर म्हणाल्या की, महिला ग्रा. पं. सदस्यांनी स्वतरूला कधीही कमजोर समजु नये, पंचायत राज व्यवस्थेमुळे गांवातील ग्राम सभेला फार मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी त्या अधिकारांचा अभ्यास करुन माहिती घ्यावी. गावाच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारकडून निधीची कमतरता भासु देणार नाही. तसेच ज्या ग्रा. पं.अविरोध निवडून आल्या आहेत त्यांना 2515 योजनेतून जास्तीत जास्त निधी प्राधान्याने उपलब्ध करुन दिला जाईल असे त्या म्हणाल्या. माजी आमदार सानंदा यांना कौतुकाची थाप देत ना. यशोमतीताई ठाकुर म्हणाल्या की, मी कार्यक्रमा निमित्त पुर्ण महाराष्ट्रासह संपुर्ण देषभर फिरले परंतु सानंदा सारखी चांगली शिस्त, नियोजन हे कोठेही पाहायला मिळाले नाही. त्यांच्याकडून भरपुर काही शिकण्यासारखे आहे. या माणसाला कमी लेखणे हे पाप आहे ही वस्तुस्थिती आहे. लाथ मारेल तेथून पाणी काढण्याची क्षमता सानंदांमध्ये असुन आमदार नसतांना सुध्दा लोकांसाठी काम करीत असल्यामुळे ते लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे.म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे सांगुन त्यांनी उपस्थितांना नविन वर्ष हे सुख समृद्धी व प्रगतीचे जावो, कोरोना नष्ट होऊन सगळे सुखाने राहो असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे आपल्या भाषणातुन म्हणाले की, ग्रा. पं. निवडणुकीमध्ये सानंदांनी नियोजनबध्द पद्धतीने काम करुन ग्राम पंचायतीमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची सत्ता आणली आहे. त्याबद्दल सानंदांचे अभिनंदन केले. सानंदा साहेब हे नेहमी जोश आणि होश मध्ये वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रम घेत असतात. जिल्हा काँगे्रसने राबविलेले उपक्रम सुध्दा ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात अशा माणसाला जर मतदार संघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मागच्या काळात खामगांव मतदार संघाचा जो विकास झाला होता त्याही पेक्षा अधिक विकास पुढच्या काळात होईल असे सांगुन त्यांनी आपले प्रेम व आशिर्वाद सदैव सानंदा साहेबांच्या पाठीशी ठेवा व येणाछया निवडणुकीत आपण त्यांना मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, खामगांव मतदार संघातील ९० टक्के जागांवर ग्राम महाविकास आघाडीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या असुन भाजपाला केवळ 10 ग्राम पंचायतीवर जागा मिळाल्या असुन भाजपाचा सफाया होवुन खामगांव मतदार संघ हा महाविकास आघाडीयुक्त मतदार संघ झाला आहे. आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीतही विजय मिळवुन खामगांव मतदार संघ 100 टक्के महाविकास आघाडी युक्त करण्याचा संकल्प घ्या. नामदार यशोमतीताई ठाकुर यांनी सेवेच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य केलेले आहे. ते विधायक कार्याला न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असतात म्हणूनच त्यांना मंत्री पदाचा बहूमान मिळाला आहे र्ताइंच्या हस्ते ग्रा. पं. सदस्यांचा होणारा सत्कार हा प्रेरणा देणारा असुन नवनियुक्त सदस्यांनी सेवेचा संकल्प घेऊन चांगले काम करुन लोकांच्या गळ्यातील ताईत बनावे. असे आवाहन त्यांनी केले.नामदार यशोमतीताई ठाकुर यांचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ. अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे सुध्दा यावेळी शाल, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. तद्नंतर ग्रा. पं. निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या नवनियुक्त ग्रा. पं. सदस्यांचा नामदार यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते तिरंगा फेटा बांधुन तिरंगा दुपट्टा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार संचालन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार व बाजार समितीचे माजी मुख्य प्रषासक पंजाबरावदादा देषमुख यांनी केले. तर आभार प्रदर्शन माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर यांनी केले. राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी खामगांव मतदार संघातील नवनियुक्त ग्रा. पं. सदस्य पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले तिरंगी झेंडयामुळे सर्वत्र तिरंगामय वातावरण निर्माण झाले होते.