शेगांव : गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.यामध्ये पोलिसांच्या पथकाने कसून तपास करून अकोला जिल्ह्यातील एका सराईत मोबाईल चोरट्याला शेगांव पोलिसांनी अटक केली आहे. शेगांव पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने शेगाव शहरात केलेल्या आतापर्यंतच्या चोरीच्या घटनांचा उलगडा केला असून त्याच्याकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे 25 मोबाईल हस्तगत केले आहे.अजय रतन पळसपगार वय 26 रा.गणोरी ता.जि अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या आरोपीवर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरी सह विविध गुन्हे दाखल आहेत. सर्व मोबाईल पोलिसांनी त्यांच्या गणोरी जि.अकोला या गावातील घरून हस्तगत केले आहे.जप्त करण्यात आलेले मोबाईल ज्यांचे असतील त्यांनी शहर पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन शेगांव पोलिसांनी केले आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे पथकाने पोलीस उप निरीक्षक योगेशकुमार दंदे,लक्ष्मण मिरगे, हेडकॉन्स्टेबल रमेश काळे, उमेश बोरसे,अमोल परीहार, विजय साळवे,भागवत काकडे यांनी केली आहे.