अडीच वर्षानंतर अजून ५ सरपंच वाढणार
खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघात नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक झाली या निवडणुकीत भाजपाने सर्वांत जास्त़ ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला होता.आज झालेल्या २४ सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीत भाजपाचे १२ सरपंच व १७ उपसरपंच निवडुन आले आहेत. यासोबतच शेगांव तालुक्यातील १४ पैकी ५ सरपंच व ३ उपसरपंच निवडुन आले आहेत. खामगांव विधानसभा मतदार संघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची एकहाती सत्ता मोडीत काढून खामगांव विधानसभा मतदार संघात सत्ता परीवर्तन घडवून आमदार पदी ॲड.आकाश फुंडकर हे आरुढ झाले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या हातुन नगर परिषद, जिल्हा परिषद, व पंचायत समिती बळकावत खामगांव मतदार संघाच्या सत्तेची सर्व सुत्र आपल्या हाती घेतली. नुकत्याच झालेलया ग्रामपंचायत निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला “जोर का झटका धिरे” से देत सर्वात जास्त़ ग्राम पंचायतीवर भाजपाचा झेडा फडकवला आहे. त्यातील पहिल्या फेरीत खामगांव तालुक्यातील २४ पैकी १२ सरपंच व १७ उपसरपंच पदी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे. तसेच शेगांव तालुक्यातील १४ पैकी ५ ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच व ३ उपसरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटावर आमदार आकाश फुंडकर हे पुन्हा सरस ठरले असून विरोधकांच्या सर्व बाता फोल ठरवत पुन्हा खामगांव विधानसभा मतदार संघावर भाजपाची एकहाती सत्ता असल्याचे सिध्द़ करुन दाखवले आहे. हयावेळी भाजपा कार्यालय येथे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.आकाश फुंडकर यांनी नवनियुक्त़ सरपंच व उपसरपंच यांचा पुष्प़हार घालून सत्कार केला.