October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

खामगांव : येथील सामान्य रुग्णालयात आरड़ा-ओरड करुन सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारीकेच्या अंगावर धाऊन गेल्या प्रकरणी एकावर शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिकेने याबाबत शहर पोलीस स्टेशनमधे दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की,खामगाव येथे सामान्य रुग्णालयातील वार्ड क्र.१मधे रात्री ८ वाजताच्या सुमारास स्टॉफ नर्स म्हणुन डयुटी वर हजर असतांना आरोपी गोविंद माळवंदे रा.चांदमारी हा जोरजोराने आरडा-ओरड करून वॉर्डमधील पेशंटना शिविगाळ करून बेडची ओढताण करत होता. यावेळी ड्यूटी वर हजर असणाऱ्या फिर्यादि त्यास म्हणाली कि बेडची ओढताण करू नको म्हटले असता आरोपी गोविंद माळवंदे हा फिर्यादी परिचालिका यांना शिविगाळ करून अंगावर धावुन येऊन शासकीय कर्तव्य करीत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केला.यावरुन परिचालिका यांनी दिलेल्या फिर्यादिवारून आरोपी गोविंद माळवंदे विरुद्ध ५२५ /२१ कलम ३५३,५०४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.आरोपी माळवंदे यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे सपोनि.रविंद्र लांडे करत आहे.

Related posts

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटखा

nirbhid swarajya

तालुकास्तरीय महाआवास अभियान पुरस्कारांचे वितरण ग्रामपंचायत लासुरा खुर्द ला मिळाला प्रथम पुरस्कार

nirbhid swarajya

जिल्ह्यात आजप्राप्त 165 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 29 पॉझिटिव्ह 71 रूग्णांची

nirbhid swarajya
error: Content is protected !!