चित्रीकरणावेळी मुख्य भूमिकेतील मिरा जोशी यांनी कथन केले जीवंत अनुभव…
मुंबई :निर्माते दिपक शर्मा यांच्या सपनोकी पाठशाला हा लघु चित्रपट 29 मे रोजी डी.डी.नँशनल वर प्रदर्शित झाला असून चीत्रपटाचे शुटिंग तारापूर मुळ गावात झाले आहे.चीत्रपटात मुख्य भुमिकेत मिरा जोशी याचेसह सह अभिनेता मनिष शर्मा आहेत तर चीत्रपटाचे दिग्दर्शन अमृतेश श्रीवास्तव यांनी केली असून कस्टिंग डायरेक्टर राज पांडे आहेत.या चीत्रपटच्या चीत्रीकरणादरम्यान अनेक किंस्से मिरा जोशी यांनी सांगितले.NCPIL च्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना प्रकर्षाने दर्शवणारा हा लघुचित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण म्हणजेच शुटींग तारापूर या वास्तविक गावात जाऊन केले आहे तिकडच्या महिलांचे राहणीमान बोलणे- चालायच्या पद्धती हे सर्व अभ्यास करून बघून काम करण्यात खूप मजा आली, नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या तसेच गावातील काही नवीन मैत्रिणी मला मिळाल्या. खेडे गावा मधल्या बायका जे काही करतात ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले आणि अनुभवायला सुद्धा मिळाले. शूटिंग दरम्यान एक महत्वाचा किंसा सांगतांना त्या सांगतात की,चित्रपटा मध्ये एक प्रसंग आहे जिथे मला पाटावर बसून भांडी घासायची होती, तो सिन शूट करताना कधी माझी साडी पाण्यात भिजायची तर कधी लोळायची आपल्याला नेहमी किचन मध्ये ओट्या समोर उभा राहून भांडी घासायची सवय असल्याने फजिती झाली होती, या वेळी तिथल्या एका महिलेने मला प्रत्यक्षात शिकवलं कि कसं पाटवर बसायचं, कसं भांड धरायचं आणि घासायच… हा चित्रपट म्हणजे एक भावनिक व हृदयस्पर्शी कथा आहे.सरकार कडून सुद्धा बऱ्याच वेळा समाज प्रबोधनाचे काम होत असते, मला सुद्धा या कामात खारीचा वाटा मिळाला याचा आनंद आहे.या चित्रपटामध्ये एक प्रेरणादायी गाणं आहे जे शूट करताना आम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पेटला होता. शिलाई मशीन वर काम करून आपले संसाराला हातभार लागेल म्हणून हा व्यवसाय म्हणून सुरू केला, मशीन चालवता येणे खूप महत्वाचे होते. माझ्या घरी आई ला मी लहान पासूनच मशीन चालवताना पहिले होते त्यामुळे मला त्याचे लहान पणा पासूनच धडे मिळाले होते, त्याचा शूटिंग च्या वेळी खूप फायदा झाला.माझा हा गावातील एक कार्यक्षम महिला साकारताना चा पहिलाच अनुभव होता, या आधी धशहरातील कॉलेज मध्ये शिकणारी मुलगी किंवा व्हिलन असेच पात्र साकारले. निरागस, अतिशय मेहनती आणि नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी, काहीतरी स्वतःच्या स्वबळावर करून दाखवण्याची जिद्द असलेली अशी भूमिका पाहिलांदाच साकारायला मिळाली आणि हि भूमिका साकारताना मला खूप मजा अली.
आपला नवरा गरीबी मुळे लोकांनी दिलेले जुने कपडे वापरतात, त्यांचे साठी आपण नवीन शर्ट घेऊन द्यावा, असे छोटेसे स्वप्न मनात ठेऊन त्या दिशेने सरकारी NCPIL च्या योजनांच्या मदतीने पुढे मार्ग काढत जाणारी ही एक साधी गावातील निरागस महिला आणि तिची कहानी यावर ही फिल्म आहे.