देशवासियांना एकत्र ठेवणारा ग्रंथ म्हणजे संविधान: तहसीलदार हेमंत पाटील
खामगाव : बोरी अडगाव येथे संविधान सन्मान सप्ताह निमित्त पहिल्या सत्रातील २४ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधान उद्देशिका वाचून करण्यात आली. यामध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून अँड प्रशांत दाभाडे,खामगाव नायब तहसीलदार हेमंत पाटील , वकील संघ अध्यक्ष मनदीपसिंग चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, रवींद्र गुरव हे होते.यावेळी एड प्रशांत दाभाडे यांनी संविधानिक मूलभूत हक्क व अधिकार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रत्येक नागरिकांना मूलभूत हक्क संविधानाने कशाप्रकारे प्रदान केले आहेत. व कोणत्या कलमानुसार अधिकार प्राप्त झाले आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत. याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तर तहसीलदार हेमंत पाटील यांनी नागरिकांनी अनेक धर्मांच्या ग्रंथाप्रमाणे सविधान वाचावे व महिलांना सुद्धा संविधाना विषयी माहिती द्यावी व संविधानिक मूलभूत हक्क समजून घ्यावे. देशवासींना एकत्र ठेवणारा ग्रंथ म्हणजे संविधान.असे त्यांनी बोलताना सांगितले तर अनेक मान्यवरांनी आपल्या संविधान विषयी जनजागृती व मूलभूत हक्क अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आडगाव चे सरपंच हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड प्रशांत दाभाडे, तर खामगाव नायब तहसीलदार हेमंत पाटील , वकील संघ अध्यक्ष मनदीपसिंग चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप जाधव, रवींद्र, तलाठी नाना सानप महसूल कर्मचारी वाणी, आसिफ पठाण हे होते. तर कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम सुरवाडे यांनी केले व सूत्रसंचालन कपिला अवचार यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले