December 14, 2025
खामगाव जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ सिंदखेड राजा

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुकांच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड उत्तर बुलढाणा जिल्हा बैठक आयोजित…

बुलढाणा: संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती झाल्यानंतर प्रथमच संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हा बैठक पार पडली.या बैठकीला संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गजानन पारधी,विभागीय अध्यक्ष इंजी.गजानन भोयर,बुलडाणा जिल्हाध्यक्ष योगेश पाटील प्रमुख उपस्थितीत होते.या बैठकीत संभाजी ब्रिगेडची भविष्यातील वाटचाल बद्दल वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आले.यामधे संभाजी ब्रिगेड शिवसेना युती,आगामी निवडणुका,पक्ष बळकटीसाठी करावयाचे नियोजन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती झाल्याने बऱ्याच लोकांच्या पोटात गोळे उठत आहे कारण त्यांना माहित आहे की संभाजी ब्रिगेडची ताकाद काय आहे तर व आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे की संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती हे वैचारिक युती आहे जे की प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर एकत्रित आली आहे असे संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी म्हटले. या युतीमुळे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.महत्त्वाचे म्हणजे या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने,उपजिल्हाप्रमुख संजय जाधव यांनी उपस्थिती लावत शिवसेना व संभाजी ब्रिगेड मिळून एकदिलाने काम करू असे वसंतराव भोजने यांनी म्हटले बैठकीत त्यांचा सत्कार वरिष्ठांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी जोरदार घोषणा देऊन बैठकीमध्ये नवचैतन्य निर्माण केले या जिल्हा बैठकीला संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव शरद पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,जिल्हा कार्याध्यक्ष एस.पी. सांबारे सर,जिल्हा संघटक डॉ.सागर महाजन,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील, मोताळा तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, तालुका उपाध्यक्ष भागवत देशमुख,खामगाव तालुकाध्यक्ष कृष्णा वडोडे,मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल वणारे,शेगाव तालुकाध्यक्ष विठ्ठल अवताडे,जळगाव तालुकाध्यक्ष रामा रोठे,दत्ता आटोळे,स्वप्नील उगले,नांदुरा तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील,तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके,तालुका प्रसिध्दीप्रमुख प्रदीप कुटे,तालुका संपर्कप्रमुख सचिन गणगे,निमगाव जिल्हा परिषद सर्कलप्रमुख वैभव पारस्कार,नांदुरा शहराध्यक्ष हिमांशू अवचार,इसापूर शाखाध्यक्ष श्याम काळे,इसापूर शखा सचिव मधुसूदन पूंडकर,भोटा शाखाध्यक्ष विनायक पारस्कार, व इतर बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.तर तर बहारदार सूत्रसंचालन डॉ.शरद पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन संभाजी ब्रिगेड मोताळा तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले बैठक यशस्वी करण्यासाठी संभाजी नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Related posts

MacBook Pro Squeezes Fans As iPad Pro Dominates

admin

आ.आकाश फुंडकर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

nirbhid swarajya

nirbhid swarajya
error: Content is protected !!