“मन चंगा तो कठोती मे गंगा” – आ.ॲड आकाश फुंडकर
खामगांव : कोरोना महामारीच्या काळात चर्मकार बांधवानी संत रविदास महाराज जयंती घरीच राहून साजरी करावी असे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर आवाहन करुन आज शहरातील चांदमारी भागातील संत रविदास महाराजांच्या मंदीरात जाऊन माल्यार्पण करुन अभिवादन केले. रविदास किंवा रैदासजी यांना भारताच्या मध्ययुगीन संत परंपरेत महत्त्वपूर्ण स्थान आहे. संत रैदासजी कबीरचे समकालीन होते. संत कवी रविदास यांचा जन्म वाराणसीजवळील गावात १३९८ मध्ये माघ पौर्णिमेच्याच्या दिवशी झाला, रविवारी त्यांचा जन्म झाल्यामुळे त्याचे नाव रविदास असे ठेवले गेले. रविदासजी रामानंद यांचे शिष्य मानले जातात. संत रविदास महाराजांनी आपल्या साधी राहणीतून सर्व समाजाला पटवून दिल की “मन चंगा तो कठौती मे गंगा.” आज कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य़ गोरगरीब जनतेवर असंख्य़ संकट येत आहे. त्यांची आर्थीक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि आता पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन सुरु केले आहे. आता पुन्हा हातावर पोट असलेल्या गरीब जनतेला मोठया संकटाला तोड द्यावे लागत आहे. परंतु अशाही परिस्थितीत संत रविदास महाराजांचे “मन चंगा तो कठौती मे गंगा” हे स्वत:ला सावरायला मदत करणार ठरते आहे. त्यामुळे अशाही परिस्थिती गोरगरीब जनतेने संय्यम ठेवत हे ही दिवस निघून जातील आणि पुन्हा जीवन पुर्वपदावर येईल. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राम मिश्रा, नगेंद्र रोहणकार श्याम माळवंदे, सतीष गवई यांची उपस्थिती होती. कोरोना महामारीमुळे समाज बांधवांनी अत्यंत साध्या पध्दतीने संत रविदास महाराज जयंती साजरी केली.